Type Here to Get Search Results !

extension of shop hours: दुकानांच्या वेळांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आज अध्यादेश निघणार

सांगली: आज सर्वसामान्यांसह दुकानदारांना मोठा दिलासा देणारे मोठे पाऊल उचलत आहेत. सांगली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार ज्या झोनमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसा अध्याधेशही आज काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. (the is preparing to take a big decision regarding the ) सांगली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या भागांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा भागांतील सर्व दुकाने सुरू करावीत अशी मागणी दुकानदार आणि व्यापारी सतत करत आहेत. काही व्यापारी संघटनांनी तर सरकारला मुदत देत बंडखोरीचा पवित्राही घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांना हायसे वाटले असून सर्वजण आता शासकीय अध्यादेशाच्या प्रतीक्षेत आहेत. क्लिक करा आणि वाचा- दुकानदारांना दिलासा देण्याबाबतची माहिती सांगत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थितीबाबतही माहिती दिली. राज्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पूरस्थितीत आतापर्यंत लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. अतिशय कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने राज्यात अशा प्रकारची पूरस्थिती निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- अतिशय कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने राज्यात अशा प्रकारची पूरस्थिती निर्माण झाली असून निसर्गापुढे आपण हतबल आहोत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- काही वस्त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असून या कामात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सांगली जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका सांगलीतील हजारो लोकांना बसला आहे. यात घराबरोबरच व्यवसायाचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. या संकटात शेतकऱ्यांची पिके देखील वाया गेलेली आहेत. जमीनीचीही मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे. मात्र, या संकटातून आपण नक्कीच मार्ग काढू असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jbedIZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.