Type Here to Get Search Results !

मुंबई विमानतळावर 'अदानी विमानतळा'चा बोर्ड; संतप्त शिवसैनिकांनी केली तोडफोड

मुंबईः मुंबई विमानतळाबाहेर सोमवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या फलकाला शिवसेनेनं विरोध दर्शवला असून कार्यकर्त्यांनी हा फलक हटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई विमानतळाचा ताबा अदानी समुहाकडे गेला आहे. त्यानंतर विमानतळाबाहेर 'अदानी विमानतळ' () असे फलक लावले होते. यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. () मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. वाचाः ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावाचे फलक लावण्यात आल्यानं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या उद्योगपतीच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर ते मान्य नाही, ते महाराजांच्या नावानेच ओळखलं जावं, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. वाचाः व्हीआयपी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकरांसमोरील बोर्ड शिवसैनिकांनी तोडला आहे, जीव्हीकेप्रमाणेच (मॅनेज्ड बाय ) अदानी कंपनीनं देखील फलक लावाला, अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली. अन्यथा जिथे फलक दिसेल तिथे तोडफोड, करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर तोडफोड केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iiAgOU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.