Type Here to Get Search Results !

मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया

मुंबई: मुंबईतील येथे असे नामफलक लावणे योग्य नाही. छत्रपतींचे नाव बदलणे ही अदानींची सर्वात मोठी चूक आहे, अशी सडेतोड प्रतिक्रिया देत काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी एकप्रकारे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. ( ) वाचा: कंपनीकडून सर्व मालकी व शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाचा ताबा अदानींकडे गेला आहे पण विमानतळाची मालकी मिळाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे नाव बदलून तिथे अदानी विमानतळ असे नाव देता येणार नाही. अदानींकडे केवळ विमानतळाचं व्यवस्थापन आहे. तितकेच त्यांचे अधिकार आहेत. विमानतळाचे नाव हटवण्याचा किंवा नवीन नाव देण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असे मलिक यांनी सुनावले. वाचा: शिवसैनिकांनी विमानतळावर धडक देत अदानी एअरपोर्ट या नामफलकाची तोडफोड केली. त्यावर बोलताना मलिक यांनी एकप्रकारे समर्थन केले. छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी विमानतळावर अदानींचे नाव झळकल्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. यातून योग्य तो बोध घेऊन जनभावनेचा आदर राखला जाईल आणि कोणीही दुखावलं जाणार नाही, याची दक्षता अदानी समूहाने बाळगावी, असे आवाहन मलिक यांनी केले. नेमकं काय घडलं? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जुलै महिन्यात जीव्हीके कडून अदानी समूहाकडे आला आहे. विमानतळाचा ताबा मिळताच तिथे अदानी एअरपोर्ट असे नामफलक अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या नामफलकांविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. सोमवारी धडक देत शिवसैनिकांनी या नामफलकाला लक्ष्य केले. शिवरायांचा जयघोष करत शिवसैनिकांनी या नामफलकाची तोडफोड केली. काही शिवसैनिकांच्या हातात लाठ्या होत्या. त्याचा प्रहार नामफलकावर करण्यात आला. शिवाजी महाराजांचे नाव हटवून अदानी आपले नाव एअरपोर्टला देणार असतील तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा या आंदोलकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, विमानतळाचे नाव बदलण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WEKW1I

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.