Type Here to Get Search Results !

आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील, मुंबई-ठाण्याचं काय?

मुंबई: राज्यात संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अखेर निर्बंधांमध्ये शिथीलता देणारा मोठा निर्णय झाला आहे. अंतर्गत सुधारित आदेश महाराष्ट्र सरकारने जारी केला असून २२ जिल्ह्यांना निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्याचवेळी शहर, मुंबई उपनगर आणि या तीन जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या आणि दैनंदिन रुग्णसंख्या अधिक असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ( ) वाचा: ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेला सुधारित आदेश उद्यापासून (मंगळवार ३ ऑगस्ट) लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी आज सांगली येथे पत्रकारांशी बोलताना निर्बंधांबाबत माहिती दिली होती. शिथीलता देण्याबाबत आजच आदेश निघेल असे ते म्हणाले होते. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सुधारित आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे कोविडच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतही निर्बंधांच्या बेडीत अडकलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ज्या जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांना तूर्त दिलासा मिळाला नसला तरी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे ३६ पैकी २२ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात मुंबई आणि ठाण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नसला तरी स्थानिक पातळीवर हा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात निर्बंध शिथील करताना ते कशा प्रकारे शिथील केले जाणार आहेत हे संबंधित पालिकांकडून आदेश जारी झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. वाचा: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये तूर्त सध्याचे लेव्हल तीनचे निर्बंध कायम राहणार आहेत. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे वगळता अन्य २२ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने आणि मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शनिवारी दुपारी तीन पर्यंतची वेळ असेल तर रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी सार्वजनिक उद्यानं आणि मैदानं खुली राहतील. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. शिफ्टची रचना मात्र गर्दी टाळता येईल अशारितीने करावी लागेल. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचे धोरण कायम ठेवावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वाचा: जीम, योगा सेंटर्स, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर्स, स्पा इत्यादी एसी न वापरता ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत चालवता येतील. शनिवारी ही वेळ दुपारी तीनपर्यंत असेल तर रविवारी सेवा बंद ठेवावी लागणार आहे. त्याचवेळी चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (मॉलमधील मल्टिप्लेक्सही) पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. धार्मिक स्थळेही तूर्त बंदच राहणार आहेत. सर्व रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कोविड नियम पाळून वीक डेजमध्ये ही मुभा असेल. वाढदिवसाचे कार्यक्रम, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, सभा, निदर्शने, मोर्चा यांना मनाई कायम ठेवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांत रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत विनाकारण फिरण्यावर निर्बंध असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jhxF6O

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.