Type Here to Get Search Results !

सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स

मुंबई: राज्य सरकारकडून साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अंतर्गत सुधारित आदेश जारी करण्यात आले आहे. हे आदेश उद्यापासून (३ ऑगस्ट) लागू होणार असून २२ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. ही शिथीलता देत असताना कोविड नियम पाळले जातील अशाप्रकारे गाइडलाइन्स ठरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. ( ) वाचा: राज्यातील २२ जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये अशी मिळणार सूट... - सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील. - सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. - सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना. - जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरू ठेवता येऊ शकतात ती तशी सुरू ठेवण्याची सूचना. - सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. - जीम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. - चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सूट नाही. - राज्यातील सर्वधर्मियांची बंदच राहतील. - शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल. - सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरू ठेवता येईल. - रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही. - गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शने, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. - मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे करोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. वाचा: 'या' तीन जिल्ह्यांत निर्बंध होणार कडक? कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यापैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्णसंख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील, असे नमूद करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xkzTr2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.