Type Here to Get Search Results !

'राजकारण तुम्ही करताय मी नाही', राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची उपरोधिक टीका

नांदेड : 'राजनिती तुम करं रहे हो मैं नही 'अशी उपरोधिक टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नांदेड दौऱ्यावर असताना केली. पत्रकारांनी दौऱ्यावरुन राजकारण होत असल्याचा प्रश्न विचारला असता राज्यपालांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता राजकीय वाद वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नांदेडच्या स्वामीरामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध उपक्रमास भेटी दिल्या. यावेळी कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या रेनहाँर्वेस्टिंग, स्टार्ट अप उपक्रमांच कौतूक करत विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान, राज्यपालांच्या या दौऱ्यावरून आधीच वाद पेटला आहे. ते सध्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसांचा दौरा करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) आणि राज्यपालांमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. ठाकरे सरकारनं राज्यपालांच्या या दौऱ्याला विरोध केल्यानंतरही राज्यपाल दौरा करत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याबाबत मुख्य सचिवांमार्फत राजभवनला कळवण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होईल, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यपालांच्या या दौऱ्यात नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तर, राज्यपाल नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करणार असल्याचं बोललं जात आहे. राजभवनाकडून जारी करण्यात आलेल्या राज्यपालांच्या सुधारित कार्यक्रम पत्रिकेत राज्यपाल तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yszch1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.