Type Here to Get Search Results !

तीन महिने वापरात असलेल्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन?

मुंबई: महाराष्ट्र दिनापासून गेले तीन महिने वापरात असलेल्या वास्तूचे मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षानं केला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केवळ श्रेय लाटण्यासाठी स्वत:चं हसं करून घेतलं असून मुख्यमंत्र्यांचीही फसवणूक केली आहे,' अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार अॅड. (Ashish Shelar) यांनी केली आहे. वाचा: मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम महापालिका कार्यालयाच्या नव्या अद्ययावत इमारतीचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यावर शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'या कार्यालयाच्या उभारणीत शिवसेनेचा कसलाही सहभाग नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडं आम्ही गेले सहा वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला. कार्यालयाचा ठराव मांडून त्यांसाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर, प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत गेल्या सहा वर्षांत मी स्वत: आठ वेळा बैठका घेतल्या. ही वास्तू १ मे रोजी लोकांसाठी खुली करण्यात आली होती. असं असताना केवळ श्रेय घेण्याचा अट्टाहास कशाला?,' असा सवाल शेलार यांनी केला आहे. वाचा: 'महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करून दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारतीबाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच, सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखणं आपलं कर्तव्य नाही का? तीन महिने लोकसेवेत असलेल्या इमारतीचं लोकार्पण रातोरात ठरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणं योग्य आहे का? असा सवाल शेलार यांनी केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्या अचानक 'गेट वे ऑफ इंडिया'च्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करू नये म्हणजे मिळवले, असा टोलाही शेलार यांनी हाणला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jokGAs

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.