Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, पण... संवादाचा पूल 'असा' तुटला

कोल्हापूर: दौऱ्यावर एकाच दिवशी आल्यानंतर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागात ठरवून एकत्र आले. एकमेकांना फोन करून दोन्ही नेत्यांनी एकत्र पूरपरिस्थितीची पाहणी केली. एकीकडे असे सकारात्मक बदल पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र , गोपीचंद पडळकर, यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते शिवसेनेवर तुटून पडत आहेत. यामुळे शिवसेना-भाजपच्या नेत्यांत संवाद आणि समर्थकांत विसंवाद असे चित्र राज्यात पहायला मिळत आहे. मुंबईपाठोपाठ सांगली जिल्ह्यातही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर वाढतच चालले आहे. ( ) वाचा: दक्षिण महाराष्ट्रात महापूर आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा करत पाहणी केली. खरं तर पूर्वनियोजित दौरा गुरुवार दि. २९ रोजी होता. मात्र, खराब हवामानामुळे ते शुक्रवारी कोल्हापुरात आले. त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकरही जिल्ह्यात आले होते. सोबत चंद्रकांत पाटीलही होते. शहरात फडणवीस पूरग्रस्त भागांची पाहणी करत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलींद नार्वेकर यांनी संपर्क साधून तुम्ही थांबा, आम्ही तेथे येतो असा निरोप दिला. त्यानुसार दोन्ही नेत्यांनी शाहुपुरी भागात पाहणी केली. रोज टीका करण्याची एकही संधी न सोडणारे दोन नेते संवादाचा पूल बांधून त्या दिवशी एकमेकांना भेटले. चर्चा केली. सुसंवाद साधला. त्यामुळे पुरापेक्षा दोन नेत्यांच्या भेटीचीच त्या दिवशी अधिक चर्चा झाली. वाचा: एकीकडे या दोन नेत्यांनी संवादाचा नवा पूल बांधला असतानाच दुसऱ्याच दिवशी समर्थकांच्या आरोप प्रत्यारोपाने तो पूल महापुरात वाहून गेला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नितेश राणे हे सतत शिवसेनेवर बोलत असतात. मंत्री राणे तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतात. आमदार राणे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल करतात. आम्हाला ड्रायव्हर नको, राज्य चालवणारा मुख्यमंत्री हवा असे म्हणत पडळकर तुटून पडतात. या सर्वात पुढे जात शनिवारी प्रसाद लाड यांची जीभ घसरली. शिवसेना भवन फोडण्याची भाषा त्यांच्या तोंडून आली आणि त्याला थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या स्टाइलने समाचार घेतला. त्यामुळे फडणवीस आणि दरेकर यांनाही प्रतिक्रिया द्यावी लागली. या सर्व घोळात शुक्रवारी बांधलेला संवादाचा पूल शनिवारीच वाहून गेला. सोमवारी तर सांगली जिल्ह्यात भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सांगलीत महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच हे घडले. यामुळे भाजप आणि सेनेत अंतर कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे स्पष्ट होत आहे. सोयीस्कर दुर्लक्ष राज्यात शिवसेनेबरोबर पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे स्पप्न भाजपचे नेते पाहत आहेत. याचवेळी सेनेवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे तीन चार नेते सोडत नाहीत. त्यामध्ये राणे आणि पडळकर आघाडीवर आहेत. हे सारे भाजपच्या नेत्यांना दिसत नाही असे नक्कीच नाही पण उपद्रवमूल्य दाखवून देणाऱ्या या नेत्यांकडे पक्षातील वरिष्ठ सोयीस्कररित्या डोळेझाक करत आहेत. यामुळेच संवाद वाढण्याऐवजी विसंवाद वाढत असल्याचे चित्र आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yky8vw

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.