Type Here to Get Search Results !

'राज्यपाल 'ही' यादी मंजूर करतील, कारण…'; रोहित पवार यांचं ट्वीट चर्चेत

नगर: महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या सदस्य नियुक्तीवरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये वाद रंगला आहे. उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ३१ जुलैच्या आत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून ही यादी ३१ जुलैपूर्वीच राजभवानात पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियातूनही यासंबंधी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका युजरने विचारलेल्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भन्नाट उत्तर दिले आहे. ( ) वाचा: ‘अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. एमपीएससीच्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलैपूर्वीच राज्यपालांकडे सदस्यांची यादी पाठवली आहे. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने ही यादी मंजूर करतील, असा विश्वास आहे', असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांची यादी अद्याप राजभवनात प्रलंबित आहे. मधल्या काळात त्यावरून अनेक आरोपप्रत्यारोप झाले. त्याचा संदर्भ देत पवार यांनी एमपीएससीच्या सदस्य निवडीसंबंधी विचालेल्या प्रश्नाना हे उत्तर देत आमदार नियुक्ती रखडल्याप्रकरणी टीका करण्याची संधी साधली आहे. याशिवाय एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीचा चेंडूही आता सरकारकडून राजभवनात टोलविण्यात आल्याचे दिसून येते. वाचा: स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने पुण्यात स्वप्नील लोणकर या उमेदवाराने आत्महत्या केली होती. त्यावरून हा विषय चर्चेत आला होता. सरकारला विरोधकांना आणि उमेदवारांनी धारेवर धरले होते. ही प्रक्रिया प्रलंबित राहण्यामागे राज्य सेवा आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागा हे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी ३१ जुलैपूर्वी या जागा भरण्याचे आणि त्यापुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मधल्या काळात सरकारच्या पातळीवरील प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, ३१ जुलै उलटून जाताच या विषयावर पुन्हा टीका झाली. त्यामुळे ही यादी यापूर्वीच राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. यासंबंधी उशीर झाल्यास त्या बारा आमदारांच्या नियुक्तीसोबतच एमपीएससीच्या सदस्यांच्या नियुक्तीलाही राजभवानाला जबाबदार धरण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C7qvL9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.