Type Here to Get Search Results !

'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहानं लावलेला '' हा बोर्ड शिवसेनेनं हटवल्यानंतर त्यावर राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. शिवसेनेनं शिवसैनिकांच्या कृत्याचं समर्थन केलं आहे, तर शिवसेनेचं हे आंदोलन टक्केवारीसाठी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. (BJP Attacks Shiv Sena over vandalising adani branding at ) धुळे येथील पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार अॅड. यांना मुंबई विमानतळावरील शिवसेनेच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना शेलार यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकारानं देण्यात आलं आहे. आज जे बोलत आहेत, ते तेव्हा पाळण्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धक्का लावण्यासक भाजप विरोध आहे आणि राहील,' असं त्यांनी सांगितलं. वाचा: 'मुंबई विमानतळ 'अदानी'कडे हस्तांतरण करण्याचा ठराव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानंच मंजूर केला. मग बाहेर आंदोलन कशाला? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली गेली नाही? जे नावब मलिक याबाबत आज बोलत आहेत, ते सरकारमध्ये आहेत. मग अदानीच्या विरोधात कारवाई का करीत नाहीत? अदानी कंपनीकडं विमानतळ हस्तांतरण करणारा जो ठराव ठाकरे सरकारनं मंजूर केला आहे, तो रद्द का करीत नाहीत? ते धाडस नवाब मलिक दाखवतील काय? आतून पाठिंबा आणि बाहेरून विरोध असं सध्या सुरू आहे. अदानीचे सरकारमधील कुणाशी संबंध आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. विरोधही आपणच करायचा आणि पाठिंबाही आपणच द्यायचा अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत,' असा टोला त्यांनी हाणला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fpw8uz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.