Type Here to Get Search Results !

भाजप-मनसे युतीच्या दिशेनं पुढचं पाऊल; चंद्रकांत पाटील म्हणाले...

पुणे: राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यात आज बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केल्यानं पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. () राज ठाकरे यांनी मला त्यांच्या एका हिंदी भाषणाची क्लिप पाठवल्याचं पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र, राज यांनी ते नाकारलं होतं. मी अशी कुठलीही क्लिप पाठवली नव्हती. ती क्लिप त्यांच्याकडं कशी गेली मला माहीत नाही. शिवाय, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. चालता चालता भूमिका बदलत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबद्दल पाटील यांना आज विचारलं असता ते म्हणाले, 'मी ती क्लिप ऐकली आहे. ती कुणी पाठवली ह्याच्याशी मला घेणंदेणं नाही. मी त्या क्लिप पाहिल्यात. त्यातल्या परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेबद्दल काही शंका आहेत. त्या राज यांना भेटून विचारेन. मी माझं म्हणणं त्यांच्यासमोर ठेवेन,' असं पाटील म्हणाले. वाचा: 'मनसेच परप्रांतीयांना असलेला विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली तर माझी काही हरकत नसेल. मात्र, युतीबाबतचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आमचा पक्ष या संदर्भात निर्णय घेईल. आता युती 'ऑन दी स्पॉट' होणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असंही ते म्हणाले. 'राज ठाकरे हे माझं आवडतं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत, खरं बोलतात,' अशा शब्दांत पाटील यांनी राज यांचं कौतुकही केलं. तो विषय आता संपलाय! भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. 'प्रसाद लाड अनावधानानं काही बोलले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. त्यामुळं तो विषय संपला आहे. मात्र, भगव्या झेंड्याचा आदर आम्हाला शिवसेनेनं शिकवू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुरुवातीपासूनच भगव्या झेंडाला गुरू मानलं आहे. शिवसेनेनं भगवा नंतर हाती घेतलाय,' असं पाटील यांनी सुनावलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jcSJvn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.