Type Here to Get Search Results !

Weather Alert : राज्यात 'या' तारखेपर्यंत आस्मानी संकट, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) इशारा जारी केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या कहरातून लोक अद्याप सावरू शकलेले नाहीत. पाऊस आणि पुरामुळे त्रस्त झालेल्या रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट आहे. हवामान खात्याने ३० जुलैपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तविली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु परिस्थिती अतिवृष्टीच्या पलीकडे गेली होती आणि पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले. थोड्या वेळासाठी थांबलेल्या पावसामुळे विस्कटलेले जनजीवन आता पुन्हा एकदा पुर्वपदावर येत आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज (२७ जुलै) आणि उद्या (२८ जुलै) पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २९ आणि ३० जुलैला ऑरेंज अलर्ट येत्या ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. २९ आणि ३० जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/376L5x3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.