मुंबई: ' () यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल,' असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार () यांनी आज केलं आहे. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Sharad Pawar) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'उद्धव ठाकरे यांची क्षमता देशाचं नेतृत्व करण्याची आहे. तो दिवस लवकरच येईल,' असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करणाऱ्या शरद पवार यांना राऊत यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी सकारात्मक उत्तर दिलं. 'महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढं येत असेल आणि त्या व्यक्तीला लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे,' असं पवार म्हणाले. दिल्लीचेही तख्त राखावे! शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'उद्धव ठाकरे हे लोकप्रिय आहेत, त्यांना पंतप्रधान केलं पाहिजे,' असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अलीकडंच म्हणाले होते. त्याचं हे मत म्हणजे एका सुसंस्कृत राजकारण्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणाला दिलेली दाद आहे, असं शेवाळे यांनी लेखात म्हटलं आहे. तीन वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांचं सरकार आणि रोज सकाळी सरकार पाडण्याच्या धमक्या देणारे विरोधक अशा दुहेरी आव्हानाचा मुकाबला करतानाच राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करणारे मुख्यमंत्री खरे 'जनतेचे नायक' ठरले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x8fhCy