Type Here to Get Search Results !

पूरस्थिती: राज्यपालांनी बोलावली बैठक; शेलार वगळता कोणीच फिरकले नाही

मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि विशेषत: कोकणातील रत्नागिरी, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि सांगलीत मुसळधार पावसाने रौद्र रुप दाखवत अनेकांचे बळी घेतले. कोकणात यंदाच्या पावसात मोठे नुकसान झाले असून त्या संदर्भात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्वपक्षीय जनप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे आमदार राज भवनाकडे फिरकलेच नाहीत. या बैठकीला केवळ भाजपचे आमदार आशीष शेलार हेच उपस्थित होते. ( did not attend the regarding the ) राज्यातील महापुराने थैमान घातल्यानंतर मोठे नुकसान झाले असून त्यासाठी केंद्राकडे मदतीचा पाठपुरावा करता यावा याच उद्देशाने राज्यपाल कोश्यारी यांनी ही बैठक बोलावली होती. मात्र, सत्ताधारी पक्षांच्या आमदार खासदारांनी या बैठकीवर एक प्रकारे बहिष्कार टाकल्याचेच चित्र निर्माण झाले. क्लिक करा आणि वाचा- या बैठकीला काँग्रेसचे नेते भाई जगताप, शिवसेनेचे नेते सुनील प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे बैठकीला गेलेच नाहीत. मदतीऐवजी राजकारण हाच मुद्दा- भाजप सत्ताधारी पक्षांच्या जनप्रतिनिधींनी राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून त्यासाठी मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच यांचा मुद्दा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीला केंद्र सरकारकडून मदतही हवी आहे आणि त्यावर राजकारणही करायचे आहे. मात्र, पूरग्रस्तांना मदत करण्यात त्यांना फारशी गरज वाटत नाही. यावरून हे किती संवेदनशील आहेत हेत लक्षात येत असल्याचे भाजपने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VeN7by

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.