Type Here to Get Search Results !

st bus driver-conductor suspended: धक्कादायक! पुराच्या पाण्यातून एसटी नेली; चालक-वाहक दोघांवरही निलंबनाची कारवाई

महाड: नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना देखील पुलावरून एसटी बस नेत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी चालकाला आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिवहन मंडळाने ही कारवाई केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रेवतळे फाट्याजवळ सोमवारी ही घटना घडली. (the driver and conductor taking the st bus from the in were suspended) विजयकुमाक रामचंद्र जाधव असे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी वाहकाचे नाव आहे. तर, अशोक लक्ष्मण दराडे असे वाहकाचे नाव आहे. सोमवारी, 12 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड डेपोची MH-14 BT-4578 या क्रमांकाच्या एसटी बस घेऊन हे दोघे रेवतळे फाट्याहून वेळासकडे जात होते. या एसटीमध्ये एकूण ५२ प्रवासी होते. वेळासकडे जाताना (रत्नागिरी) ही एसटी महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथे आली असता नागेश्वरी बंधारा आणि खाडीपट्ट्याकडे जाणारा रस्ता ओव्हरफ्लो झाला होता. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. क्लिक करा आणि वाचा- अशी स्थिती असतानाही एसटी चालकाने धोका पत्करून गाडी पुढे रेटली आणि वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढला. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच या एसटीचे चालक आणि वाहक अशा दोघांना निलंबित करण्यात आले. ही माहिती रायगड जिल्हा परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- गेल्या काही दिवसांपासून कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहा,अलिबाग, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये नदीनाल्यांना पूर आला आहे. रविवारी अलिबाग-मुरूड मार्गावरील काशिदजवळील एक पूल देखील कोसळला होता. यामुळे मुरुड तालुक्याचा संपर्क तुटला होता. कोकणात अशी परिस्थिती असतानाही एसटीच्या चालक आणि वाहकाने बेजबाबदारपणा दाखवल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hAmQx5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.