Type Here to Get Search Results !

लहान मुलांना लवकरच उपलब्ध होणार लस? कोव्हॅक्सिन ट्रायलमधील मुलांना गुरुवारी दुसरा डोस

नागपूर : कोव्हिडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने १ ते १८ वयोगटातील लहान मुलांवरील करोना प्रतिबंधात्मक लशीची ट्रायल सुरू केली आहे. उपराजधानीतील मेडिट्रीना रुग्णालयात ही चाचणी घेतली जात आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांना लशीचा पहिला डोस देऊन बुधवारी २८ दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे या मुलांना गुरुवारी लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. काही मुलांचे रक्ताचे नमुने घेऊन ते दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. समाधानाची बाब म्हणजे लशीचा पहिला डोस दिलेल्या मुलांमध्ये कुठलेही साईड इफेक्ट आढळून आलेले नाहीत. जून महिन्यात देशभरात लहान मुलांवर लशीची चाचणी सुरु झाली आहे. त्यात महाराष्ट्राची उपराजधानी अर्थात नागपूरचाही समावेश आहे. १ ते ६, ६ ते १२ आणि १२ ते १८ या तीन वयोगटांमध्ये मुलांना लशीचा डोस देण्यासाठी ह्यूमन ट्रायल घेतली जात आहे. सर्वात आधी ६ जून ला १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना लशीचा पहिला डोस दिला गेला. त्यानंतर २८ दिवसांनी (४जुलै) त्यांना दुसरा डोस देण्यात आला. १६ जून रोजी ६ ते १२ वयोगटातील २५ मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला होता. आता बुधवारी या मुलांना लशीचा पहिला डोस देऊन २८ दिवस पूर्ण होणार आहेत. त्यांना गुरुवारी १५ जुलैला दुसरा डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत ६ ते १२ वयोगटातील मुलांना दुसरा डोस देण्यात येईल. यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने दिल्ली येथे पाठविण्यात येतील. तीनवेळा नमुने घेण्यात येतील. याशिवाय मुलांना डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येत आहे, अशी माहिती ह्यूमन ट्रायल लसीकरणाचे समन्वयक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hyIZMq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.