Type Here to Get Search Results !

kharge criticizes modi govt: मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, केला 'हा' आरोप

मुंबई: काँग्रेसचे नेते (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या योजनांमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून वर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशातील २३ टक्के जनता पुन्हा गरिबीत लोटली गेली आहे. त्यामुळे हे लोकांचे उत्पन्न घालवणारे सरकार आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे. एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असतानाही मोदी विश्वगुरू व्हायला चालले आहेत. प्रथम तुम्ही देशाचे गुरु तरी बना, अशी खोचक टीकाही खरगे यांनी केली आहे. (congress leader criticizes pm narendra modi and central govt) मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना खरगे म्हणाले की, 'केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांमुळे देशातील गरीब जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेली आहे. एकीकडे करोनाचे संकट आहे, तर दुसरीकडे लोकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशातील लोकांना मी चांगले दिवस दाखवेन आणि याच मुद्यावर त्यांनी मतेही घेतली होती. आता मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.' क्लिक करा आणि वाचा- डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. पेट्रोलच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. इतकेच नाही, तर डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्या तेलाच्या किंमती उतरल्या. तरी देखील देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांचा विचार करायचा झाल्यास तब्बल ३८ वेळा हे दर वाढवण्यात आले आहेत, असे खरगे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- इंधनांच्या किंमतीवर सेस लावण्याचे काम करत असून तो कोणत्याही राज्याला न मिळता थेट केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जात आहे. पेट्रोलवर कर लावून तर केंद्र सरकारने २५ लाख कोटी रुपये कमवले आहेत. मात्र, केंद्राने त्यातील महसूल कोणत्याही राज्याला दिलेला नाही, असे सांगतानाच सिलेंडरवर मिळणारी सबसिडी तीन महिन्यापासून कोणालाच मिळलेली नाही, याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले आहे. 'मोदी सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष' गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकार कोणताही प्रयत्न करत नसल्याचेही ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- करोनामुळे देशात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या किती, तसेच करोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला, याची माहिती केंद्र सरकारकडे नाही. या बाबतची सत्य माहिती जर उघड झाली, तर देशातील खरी परिस्थिती देशाला समजेल, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eaCRaZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.