Type Here to Get Search Results !

'नेत्यांनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा दौऱ्यावर जात नाही, त्याला कारण आहे'

मुंबई: 'पूरग्रस्त भागांत सध्या सुरू असलेलं मदत व पुनवर्सन कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी राजकीय नेत्यांनी या ठिकाणांचे दौरे टाळावेत,' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी दिल्या आहेत. ( to avoid tours at flood hit villages) राज्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीच्या वतीनं सुरू असलेल्या व येत्या काळात हाती घेतल्या जाणाऱ्या मदतकार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना अडीच कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत दोन दिवसांत पोहोचवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 'पुनवर्सनाबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करील,' अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. वाचा: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता विरोधी पक्षाचे नेतेही व सरकारमधील काही मंत्रीही पूरग्रस्त भागांमध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सर्वांनाच महत्त्वाचं आवाहन केलं. 'माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. लातूरमधील भूकंपाच्या वेळी आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं, दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. माझी विनंती मान्य करून तेव्हा पंतप्रधान दहा दिवसानंतर आले होते, आताही तशीच परिस्थिती आहे. सरकारी यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यग्र आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, त्यामुळं असे दौरे टाळावेत, असं पवार म्हणाले. वाचा: 'राज्यावर अशा प्रकारचं संकट आल्यानंतर मी दौऱ्यावर जात असतो. पण मी आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे झाल्यामुळं लोकांना धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो,' याकडं त्यांनी लक्ष वेधलं. राज्यपालांना चिमटा राज्यपाल पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जाणार आहेत याबाबत विचारलं असता पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 'राज्यपाल जात आहेत हे ठीक आहे. त्यांचे व केंद्राचे संबंध‌ चांगले आहेत‌. ते‌ जास्त मदत आणू शकतात. केंद्रातून मदत मिळवून देण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा, असा चिमटा पवार यांनी काढला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iPrNS9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.