Type Here to Get Search Results !

कमालच झाली! विहिरीत बुडालेल्या कारच्या बदल्यात मिळाली नवी कोरी कार

मुंबईः इमारतीसमोर पार्किंगमध्ये उभी केलेली कार तिथेच बुडाल्याचा व्हिडिओ गेल्या महिन्यात व्हायरल झाला होता. त्यावरुन अनेक मीमदेखील व्हायरल झाल्यानंतर ही कार सोशल मीडियावर हिट ठरली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या कारचा किस्सा चर्चेत आला आहे. आता या कारच्या मालकाला नवी कोरी कार भेट देण्यात आली आहे घाटकोपर येथील एका इमारतीतील पार्किंगमध्ये खड्डा तयार होऊन त्यात चक्क कार बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करुन ती विहीर झाकण्यात आली होती. त्या आरसीसी केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी कार पार्क करत होते. या कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले तर काहींना महापालिकेवर जोरदार टीका केली होती. तसंच, कारच्या मालकाचं नुकसान झाल्याबद्दल दुखःही व्यक्त केलं होतं. आता मात्र, बजाज अलाएन्सने या कार मालकाला म्हणजेच डॉ. किरण दोषींना नवी कार भेट दिली आहे. कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी घरी आले होते. त्यांनी माझ्याकडून एक फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी कार डिलरला कंपनीच्यावतीने कार पुरवण्यात आली, अशी माहिती डॉ. दोषींनी दिली आहे. तसंच, बजाज अलायन्सनं दाखवलेल्या तत्परतेने खुश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १२ तासांनंतर कारला बाहेर काढण्यात आलं होतं कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंपाच्या सहाय्याने विहिरीतील लाखो लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला होता. त्यानंतर १२ तासांनंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेली नव्हती. महापालिकेवर झाली होती टीका कार खड्ड्यात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका करण्यात आली होती. यावर मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन खात्याकडून अधिक माहिती देण्यात आली आहे व या घटनेशी महापालिकेचा कोणताही संबंध नसून ही एका खासगी सोसायटीतील घटना असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k0t77a

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.