Type Here to Get Search Results !

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना थेट इशारा

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना शिवसेनेचे खासदार () यांनी केंद्रीय मंत्री (Smriti Irani) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं भाजपच्या महिला नेत्या () संतापल्या आहेत. चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आम्हीही 'अरेला कारे' करू शकतो, असा इशारा वाघ यांनी दिला आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. त्यात शिक्षणमंत्र्यांचाही समावेश आहे. त्याबाबत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला टोला हाणला होता. 'कालपर्यंत रॉकेल, पेट्रोल विकणारे धर्मेंद्र प्रधान आता शिक्षणमंत्री झाले आहेत. त्याआधी रमेश पोखरियाल होते. ते कधी शाळेत गेले नव्हते, पण देशाचे शिक्षणमंत्री होते. पोखरियाल यांच्या आधी स्मृती इराणी होत्या, त्या मॉडेलिंग करायच्या. शिक्षणाचा काही संबंध नसलेले लोक शिक्षणमंत्री होतात, असं राऊत म्हणाले होते. नारायण राणेंना मिळालेल्या खात्यावरूनही त्यांनी टोला हाणला होता. वाचा: राऊत यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. ' यांच्या बाबतीत संजय राऊत कधी नव्हे ते खरं बोलले आहेत. राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे हे राऊतांचं म्हणणं खरं आहे आणि यापुढंही ती वाढतच जाईल. म्हणूनच शिवसेनेला ते झेपले नाहीत,' अशी खोचक टीका वाघ यांनी केली आहे. वाचा: स्मृती इराणी यांच्याबद्दल केलेल्या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला वाघ यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'स्मृती इराणींबद्दल जे काही बरळलात ती निव्वळ चमचेगिरी आहे. तुमच्या या चमचेगिरीचा आणि 'सामना'च्या संपादकपदाचा काय संबंध आहे याचा खुलासा करा मग मी इराणी आणि त्यांच्या मंत्रिपदाचा काय संबंध आहे याचा खुलासा करेन,' असं वाघ यांनी म्हटलं आहे. 'महिलांचा सन्मान होईल अशी विधानं करा, नाहीतर आम्हालाही 'अरेला कारे' करायची भाषा चांगली येते हे ध्यानात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तुम्हालाही काँग्रेस-राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल! राष्ट्रवादी व शिवसेनेतून आलेल्या लोकांनाच भाजपला मंत्री करावं लागलं आहे. चांगल्या लोकांचा पुरवठा केल्याबद्दल भाजपनं शिवसेना व राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, असं राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना वाघ म्हणाल्या, 'तुमच्या भावालाही कधीतरी मंत्रिपद मिळेल. तेव्हा तुम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानायचं सौभाग्य मिळेल.' वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36mhZJA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.