Type Here to Get Search Results !

अनिल देशमुख प्रकरणात दोन बडे अधिकारी?; सीबीआयचे १२ ठिकाणी छापे

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी याला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाने व ईडी यांच्याकडून चौकशी सुरू असून आज सीबीआयने मोठी कारवाई केली. सीबीआयकडून मुंबई, ठाणे, पुणे नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ( ) वाचा: मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी आज छापे टाकले आहेत. यात मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त यांच्या अहमदनगर मधील घरावर तसेच सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे. याशिवाय ठाणे, नाशिक, सांगली, अहमदनगर आणि पुणे येथे काल छापे टाकण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. या कारवाईदरम्यान अनिल देशमुख प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व इलेक्टॉनिक पुरावे हाती लागल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले. वाचा: ईडीचे पथक पोहचले संगमनेरमध्ये मुंबई पोलीस दलात उपायुक्त असलेल्या राजू भुजबळ यांचे घर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असून ईडीच्या पथकाने तिथे धडक दिली आहे. ईडीची टीम दोन वाहनांतून आली होती. त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांकडे मात्र याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डीटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट डाटा सापडला असून त्याआधारावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे कळते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f4O7pO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.