Type Here to Get Search Results !

जळगावात मधुमेहाने त्रस्त कैद्याचा मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

जळगाव: मधुमेहाने त्रस्त असलेल्या उपकारागृहातील तरुण कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या कैद्याला वेळेवर उपचार न मिळाले नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करीत कैद्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांनी मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. (वय २९, रा. एरंडोल) असे मृत कैद्याचे नाव आहे. ( ) एरंडोल तालुक्यात ६ जून २०१८ रोजी उमेश उर्फ खंडू अशोक पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणात पवन महाजन याच्यासह पंकज नेरकर, दशरथ महाजन, भरत महाजन व राहुल महाजन या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. १६ जून २०१८ पासून सर्व पाचही जण जिल्हा कारागृहात बंदी आहेत. दरम्यान, पवन याला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. आज बुधवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पवनचे मामा शाम महाजन यांनी कारागृह प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. महाजन यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात पवनला त्रास जाणवू लागला होता. मात्र, त्याला रुग्णालयात नेण्यात आले नाही. त्यानंतर १९ जुलै रोजी डॉ. व रुग्णालयात त्याला नेण्यात आले. त्यावेळी देखील रुग्णालयात दाखल करून न घेता त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. कारागृहात आल्यानंतर त्याला पुन्हा त्रास झाला. यानंतर २७ जुलै रोजी त्रास वाढल्यामुळे सकाळी ९.३० वाजता रुग्णालयात आणले. यावेळी रक्ताचे नमुने घेण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत काहीच उपचार केले नाहीत. रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तात्काळ आयसीयूत दाखल करण्यात आले. त्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाला. जर पवनला १९ जुलै पासूनच रुग्णालयात दाखल करून व्यवस्थित उपचार केले असते तर ही घटना घडली नसती. कारागृह प्रशासनाने जाणूनबुजून त्याला रुग्णालयात दाखल केले नाही, असा आरोप शाम महाजन यांनी केला आहे. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन पवन न्यायालयीन बंदी होता. त्यामुळे या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी न्यायाधीश वैभव जोशी हे दुपारी दोन वाजता रुग्णालयात पोहचले. त्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूच कारण, अहवाल गोपनीय ठेवण्यात आले आहे. न्यायाधीश या घटनेची चौकशी करणार आहेत. पवन महाजन या कैद्यास मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्याला गेल्या आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात नेण्यात आले. २३ जुलैपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी देखील वेळोवेळी औषधोपचार करण्यात येत होते, अशी माहिती कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yb1hcx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.