Type Here to Get Search Results !

करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

मुंबई: राज्यातील संसर्गाचा ग्राफ खाली आला असला तरी दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम आहे. आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ८ हजार ६३४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. ( ) वाचा: राज्यातील काही जिल्ह्यांत करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी , , , नागपूर यासारख्या प्रमुख शहरांत करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. राज्यात नवीन करोना बाधितांची संख्या अपेक्षित प्रमाणात अजून कमी होत नसली तरी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख १६ हजारांपर्यंत घटली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६ टक्क्यांच्यावर गेले आहे. होम क्वारंटाइन आणि संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वाचा: अशी आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती: - राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.०१ टक्के एवढा. - आज राज्यात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान. - दिवसभरात ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन परतले घरी - आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ करोना बाधित रुग्ण झाले बरे. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.०१ टक्के एवढे. - राज्यात सध्या करोनाचे १ लाख १६ हजार ६६७ ॲक्टिव्ह रुग्ण. - आतापर्यंत ४,१८,७५,२१७ व्यक्तींच्या चाचण्या. - एकूण नमुन्यांपैकी ६०,७०,५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. - सध्या राज्यात ६,१५,२८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये - ४ हजार ३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AmNVvo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.