Type Here to Get Search Results !

तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; गर्दी नव्हती तरीही...

पिंपरी: ' हिच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा , वारी चुको न दे हरी ' अशी भावना बाळगत जगद्‌गुरू श्री महाराजांच्या पालखीचे आज मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथून प्रस्थान झाले. करोना संकटामुळे भाविकांच्या गर्दीवर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा झाला. मात्र, परंपरेत कुठलाही खंड पडू दिला नाही. रितीरिवाजाचे तंतोतंत पालन करण्यात आले. ( Latest Update ) वाचा: मुख्य मंदिरात पहाटे विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर शिळा मंदिर आणि पालखी सोहळ्याचे जनक मंदिरात परंपरेप्रमाणे पूजा झाली. यंदाच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याला खासदार यांची उपस्थिती होती. पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले या भावनेने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. मंदिराच्या परिसरात प्रसन्न वातावरणात वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन होते. वातावरण ढगाळ असल्यामुळे उत्साहाला उधाण आले होते. विणेची झंकार, टाळ-मृदंगाचा गजर आणि तुतारीचा निनाद या तालावर वारकऱ्यांची मने डोलत होती... पावले ठेका धरत होती. हरिनामाच्या गजरात वैष्णव तल्लीन झाले होते. वाचा: मुख्य मंदिरात भाविकांना दुपारी एक वाजल्यापासून प्रवेश देण्यात आला. दोन वाजता भजनी मंडपात प्रस्थान विधीला प्रारंभ झाला. खासदार संभाजीराजे यांच्यासह शहाजीराजे भोसले, मानाचे वारकरी वढू येथील हनुमंतराव शिवले यांच्या हस्ते पूजा झाली. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे आणि त्यांच्या पत्नी सविता बारणे, आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारीका शेळके उपस्थित होते. ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे यांनी पाद्य व कलशपूजा केली. सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. या वेळी मंदिर परिसरात वारीतील पारंपरिक खेळ रंगले होते. डोईवर तुळशीवृंद घेऊन महिला भगिनी विठ्ठलनामात दंग झाल्या होत्या. वाचा: विविधरंगी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. आरती झाली. चोपदार नामदेव गिराम यांनी दंड उंचावताच सूर टिपेला पोहचला. पालखी खांद्यावर घेत वारकरी नाचू लागले. तुतारीचा गगनभेदी आवाज होताच 'माऊली-तुकाराम' जयघोष झाला. त्याने मंदिर परिसर भक्तिमय झाला. पालखी भजनी मंडपातून बाहेर येताच वारकऱ्यांमधील उत्साह द्विगुणित झाला. सेवेकऱ्यांनी पालखीवर छत्र धरले. जरीपट्टा, गरूडटक्के, चांदीची अब्दागिरी व पताका अशा थाटात पालखीने मंदिर प्रदक्षिणा घातली. साडेचार वाजताच्या सुमारास पालखी पुन्हा भजनी मंडपात ठेवण्यात आली. येथे तिचा मुक्काम १९ जुलैपर्यंत असणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dxQyk5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.