Type Here to Get Search Results !

मुंबई: मतदारयादीत फोटो नसल्यास नाव वगळणार; 'या' तारखेपर्यंतच मुदत

मुंबई: निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले १ लाख १८ हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून ज्या मतदारांचे छायाचित्र मतदारयादीमध्ये आढळून येत नाही अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदारसंघात जाऊन आपले छायाचित्र ८ जुलै २०२१ पूर्वी जमा करावीत अन्यथा त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, असे महत्त्वाचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. ( ) वाचा: मतदारयाद्यांमध्ये छायचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यांत शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. दोष रहित व अचूक मतदारयादी तयार करण्यासाठी मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीतील छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदारसंघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदारसंघाच्या कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचा: निर्धारित वेळेत छायाचित्र जमा न केल्यास आपण सदर मतदारसंघातून स्थलांतरित झाला आहात अथवा आपण सदर मतदारसंघात रहात नाही, असे गृहित धरण्यात येऊन आपले नाव मतदारयादीतून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले असून याविषयी काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास संबंधित जवळच्या मतदारसंघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yf34wC

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.