Type Here to Get Search Results !

बकरी ईद यंदाही साधेपणाने; अशा आहेत राज्य सरकारच्या गाइडलाइन्स

मुंबई: या विषाणूच्या संसर्गामुळे उद्धवलेली परिस्थिती पाहता गतवर्षीपासून विविध उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे. म्हणूनच यंदा २१ जुलै रोजी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. ( ) वाचा: कोविड स्थितीत सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरून बकरी ईदची मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. तसेच सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक करावी. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र न जमण्याच्या सूचनाही गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आलेल्या आहेत. वाचा: कोविड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील पालन करावे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36glgdl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.