Type Here to Get Search Results !

बीएचआर घोटाळा: तळघरातील २५०० फायलींमध्ये दडलंय काय?

जळगाव: पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सात महिन्यांनंतर पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या मुख्य संशयित अवसायक यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात आणून त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याला संस्थेच्या मुख्य कार्यालयात नेवून कागदपत्रे दाखवून ही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेले संशयित अंबादास मानकापे व आसिफ तेली या दोघांनी कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. आज मंगळवारी पुण्याच्या विषेश न्यायालयात तसे अर्ज त्यांनी सादर केले आहेत. ( ) वाचा: प्रकरणी पुणे पोलिसांना तब्बल सात महिन्यांनंतर गवसलेला मुख्य संशयित तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे हा पोलीस कोठडीत आहे. त्याला आज पुणे पोलिसांनी जळगावात आणून चौकशी सुरू केली आहे. बीएचआरच्या जळगावातील एमआयडीसी येथील मुख्य कार्यालयाच्या तळघरात २५०० फायली पोलिसांना आढळून आल्या होत्या. या फायलींची चौकशी कंडारेकडून पोलीस निरीक्षक यांच्यासह पथक करीत आहे. कागदपत्रांचा आधार घेऊन कंडारेची चौकशी सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत पथक बीएचआरच्या मुख्य शाखेत थांबून होते. यावेळी त्यांनी बीएचआरच्या जुन्या कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. वाचा: मंगळवारी पुणे विषेश न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात अंबादास मानकापे, सुजित वाणी व संजय तोतला या तिघांच्या जामीन अर्जांवर सुनावणी झाली. तर आसिफ तेली व मानकापे या दोघांनी कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दाखवत न्यायालयात अर्ज दिले आहेत. सात जुलै रोजी सुनील झंवर याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण तर त्रयस्थ अर्जदार म्हणून अॅड. मनोज व अक्षता नायक काम करीत आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ywW7aj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.