Type Here to Get Search Results !

काळजी घ्या! महापुरानंतर महाडमध्ये साथीच्या रोगाचे थैमान

महाडः महाडमधील महापूराचे पाणी आता ओसरले असले तरी नागरिकांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. महापुरानंतर महाडमध्ये साथीचे आजार बळावले आहेत. त्यामुळं पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तातडीने आरोग्य तपासणी करावी, असं आवाहन प्रशासनाने केले आहे. (mahad flood) पुरानंतर महाडमध्ये १५ जणांना लेप्टो स्पायरेसीस तर तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. महाडमध्ये पूर ओसरून आता आठवडा होत आला आहे. तरीही संपूर्ण शहरात अजूनही कचऱ्याचे साम्राज्य पसरलं आहे. शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. अनेकांच्या घरातील चिखलगाळ काढण्याचे काम सुरू झाले असून, घरातील भिजलेल्या वस्तू आणि गाळ नागरिकांना रस्त्यावर टाकावा लागत आहे. हा गाळ तसाच रस्त्यावर पडून आहे. सध्या शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळं रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाचाः पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे शहरातील आरोग्य पथके महाडमध्ये रवाना झाले आहेत. महाडसह पोलदपूर व अन्य ११ ठिकाणी आरोग्य तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरेसीस, काविळ आणि करोना तसंच इतर साथीच्या रोगांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत आत्ता पर्यंत १५ लेप्टोचे रुग्ण तर तीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत. वाचाः पूरग्रस्त भागात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, आरोग्य पथकाकडून जखम झालेल्या नागरिकांसाठी टिटॅनसच्या लसीही उपलब्ध करुन दिल्या आहेत. वाचाः वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jaDL96

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.