Type Here to Get Search Results !

मुंबई: धारावीत आज करोनाचा एकही नवा रुग्ण नाही; 'असा' दिला लढा

मुंबई: संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही दाट लोकवस्ती असलेल्या विभागाने सर्वांना थक्क करणारे काम करून दाखवले आहे. धारावीत करोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून आज पुन्हा एकदा धारावी दैनंदिन रुग्णसंख्येच्या बाबतीत निरंक राहिली. गेल्या २४ तासांत करोनाचा एकही नवीन रुग्ण धारावीत आढळला नाही. दरम्यान, जी नॉर्थ वॉर्डात आज १३ नवीन रुग्णांची भर पडली असून हे सर्व रुग्ण आणि भागातील आहेत. ( ) वाचा: जी नॉर्थ वॉर्डात धारावी, दादर आणि माहीम हा भाग येत असून करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही मुंबईत हा भाग हॉटस्पॉट ठरला होता. यात धारावी हा मुंबईतील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग असून येथे करोनावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान मुंबई महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे उभे ठाकले होते. मात्र नियोजनबद्धपणे उपाययोजना राबवत येथील करोना स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात संबंधित यंत्रणांनी यश मिळवले आहे. धारावीची करोनाची ताजी आकडेवारी हाती आली असून गेल्या २४ तासांत धारावीत नवीन एकही करोना बाधित आढळला नाही. विशेष म्हणजे ११ फेब्रुवारीपासून आतापर्यंत चारवेळा असं दिलासादायक चित्र धारावीत पाहायला मिळालं आहे. याआधी १४ जून, १५ जून आणि २३ जून रोजी धारावीची दैनंदिन रुग्णसंख्या निरंक राहिली होती. आशिया खंडात धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी असून करोनाने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत एकूण ६ हजार ९०१ रुग्णांची येथे नोंद झाली आहे. सध्या धारावीत करोनाचे फक्त २२ सक्रिय रुग्ण आहेत. वाचा: धारावीला लागून असलेल्या माहीममध्ये आज ७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. माहीममध्ये आतापर्यंत करोनाचे १० हजार २१ रुग्ण आढळले असून सध्या ७० सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्ये आज ६ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ९ हजार ६९८ वर पोहचली आहे. दादरमध्ये सध्या १२५ सक्रिय रुग्ण आहेत. जी नॉर्थ वॉर्डात आतापर्यंत करोनाचे एकूण २६ हजार ६२० रुग्ण आढळले असून त्यातील २५ हजार ६५८ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, धारावीने करोना संसर्गाशी दिलेल्या लढ्याची जगभरात दखल घेतली गेली आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट ही त्रिसूत्री वापरून धारावीत करोनावर नियंत्रण ठेवण्यात आले. जितक्या वेगाने धारावीत करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला तितक्याच वेगाने साथ आटोक्यातही आणली गेली. या ' 'चं जागतिक आरोग्य संघटनेसह देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलेलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hCQFMB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.