Type Here to Get Search Results !

ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले; फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई: लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम राज्यातील सरकारने केले असून राज्याच्या विविध खात्यांत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर विरोधी पक्षाने बोलूच नये, अशी रचना अधिवेशनात करण्यात आली आहे, असा आरोप करताना अशी कितीही कोंडी केली तरी जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. प्रश्न अधिवेशनात मांडता आले नाहीत तर जनतेत जाऊन, रस्त्यावर उतरून ते आम्ही मांडू, असा इशारा विरोधी पक्षनेते यांनी आज दिला. ( ) वाचा: राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय उद्यापासून (५ जुलै) सुरू होत असून या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. अधिवेशनात कोणतेही संसदीय आयुध वापरता येणार नाही, अशा पद्धतीने सारी आखणी करण्यात आली असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. हे सरकार लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम करत आहे. प्रश्न नाहीत, उत्तरे नाहीत मग हे कसले अधिवेशन? आमच्याकडे सरकारला जाब विचारावा असे १०० विषय आहेत पण आम्ही सभागृहात बोलूच शकणार नाही, अशी स्थिती निर्माण केली गेली आहे. आरक्षणाचा विषय आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, राज्याच्या विविध खात्यांत बोकाळला आहे. वसुलीची प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत. हे सर्व लक्षात घेऊन अधिवेशनाला कात्री लावण्यात आली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. वाचा: सरकारने विरोधी पक्षाची कितीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. आम्ही आक्रमकतेने पण तितक्याच संयमाने जनतेचे प्रश्न मांडणार आहोत. सभागृहात हे प्रश्न मांडू दिले गेले नाहीत तर जनतेमध्ये जाऊन, रस्त्यावर उतरून या प्रश्नांना आम्ही वाचा फोडू. मग रस्त्यावर उतरून हे गर्दी करतात असे म्हटले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. निवडीवरही फडणवीस बोलले. सरकारमधील तीन पक्षांमध्ये विसंवाद असल्यानेच विधानसभा अध्यक्षांची निवड लांबली आहे. आताही ती होईल असे वाटत नाही, असे नमूद करताना तुमच्याकडे बहुमत आहे तर मग हे महत्त्वाचे पद रिक्त का ठेवले, असा सवाल फडणवीस यांनी केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jKZ9nk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.