Type Here to Get Search Results !

'तो' मृतदेह तासभर रस्त्यावरच होता; जखमी मित्र शेजारीच बसून होता पण...

जळगाव: मित्राच्या मुलीच्या लग्नाला जात असताना दुचाकीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दुसरा तरुण या अपघातात जखमी झाला आहे. ही दुर्घटना आज सकाळी नऊ वाजता तालुक्यातील इदगाव रस्त्यावर घडली. दरम्यान, रुग्णवाहिकेअभावी तरुणाचा मृतदेह रस्त्यावर सुमारे तासभर ठेवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे. (वय २६, ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर (वय २७) हा जखमी झाला आहे. ( ) वाचा: शासकीय गोदामात हमालीचे काम करणाऱ्या सागरचे सहकारी यांच्या मुलीचे अट्रावल (ता. यावल) येथे लग्न होते. या लग्नासाठी सागरसह अनेक मित्र ट्रक व दुचाकीने निघाले होते. सागर व गोविंदा हे दोघेही दुचाकीने (एमएच १९ बीपी ७४१३) अट्रावलकडे निघाले होते. ममुराबादपासून काही किलोमिटर अंतर पुढे जाताच त्यांच्या दुचाकीला एका भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिली. या धडकेत सागरचा जागीच मृत्यू झाला तर गोविंदाच्या उजव्या पायाला दुखापत झाली. अपघातनंतर मालवाहू वाहनाचा चालक वाहन सोडून पळून गेला तर मृत सागर रस्त्यावरच पडू होता. त्याच्या शेजारी गोविंदा बसून राहिला. गोविंदाने अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिली. यांनतर घटनास्थळावर गर्दी झाली होती. वाचा: दरम्यान, सागरचा मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी बराचवेळ वाहन उपलब्ध झाले नाही. तासाभरानंतर रुग्णवाहिकेतून सागरचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. मृत सागर व जखमी गोविंदा हे दोघे एकाच गावात राहणारे तसेच एकमेकांचे नातेवाईक आहेत. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात गर्दी करीत आक्रोश केला. मृत सागर याच्या पश्चात वडील राधेशाम मोरे, आई सिंधुबाई, पत्नी पुजा, मुलगा राघव (वय ७), मुलगी उज्ज्वला (वय ४) असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ybr30h

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.