Type Here to Get Search Results !

बच्चू कडूंच्या आश्वासनानंतर अखेर प्रकल्पग्रस्तांचं उपोषण मागे, आर्थिक मदतीचा दिला शब्द

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पेढी नदीवर निम्नपेढी प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पामुळे अनेक गावे विस्तापित झाली आहे. त्यातील हातुर्णा गावासहित पाच ते सहा गावे विस्तापीत झाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी राहती घरे, शेती सोडून मिळेल त्या ठिकाणी राहण्यास गेले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मदत, घरे आणि दाखले मिळाले नाहीत. यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून उपोषण करण्यात आलं होतं. त्याची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडूंनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. खरंतर, अनेकदा निवेदने देऊनही दखल न घेतल्याने काही महिला अमरावती येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषनाला बसल्या होत्या. त्यामुळे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या उपोषणाला भेट देत त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना पाठींबा दिला. तर बच्चू कडू यांच्या आश्वासनानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, सरकार काय करेल हा नंतरचा भाग आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समस्या ही राज्यातील प्रकल्पग्रस्तांची असून ती सरकारकडे ठेऊन त्या मार्गी लागतील. यासाठी प्रयत्न करू आणि घरे बांधण्यासाठी 2 ते 2.50 लाख रुपयांची मदत मिळेल असं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या या शब्दावर आता सरकार कधी मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SoO54b

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.