Type Here to Get Search Results !

test for omicron: खळबळजनक! विदेशातून आलेले 'ते' सहाजण करोनाग्रस्त; त्यांच्यासोबत होते ४२ जण

कल्याण: गेल्या काही दिवसांत परदेशातून कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivli)आलेल्या प्रवाशांपैकी सहा जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह (Corona Positive)आली आहे. या सहाही जणांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व रुग्ण सौम्य प्रकारच्या कोरोना लक्षणाचे आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांपैकी एकही रुग्ण हा हाय रिस्क देशांमधून आलेला नाही. सहा पैकी चार प्रवासी नायजेरीयातील आहेत. एक प्रवासी नेपाळ आणि एक रशियामधून आला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. या सहाही जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. (threat of varient the six who came to from abroad tested ) दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या ३२ वर्षीय रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. केडीएमसीकडून त्याच्या कुटुंबीयांची देखील चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या रुग्णासोबत विमानात ४२ सहप्रवासी होते. या ४२ प्रवाशांची यादी केडीएमसीने शासनाला दिली असून ज्या भागात प्रवासी राहतात त्या त्या महापालिकेकडून त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. दरम्यान या ४२ मधील आणखी एक प्रवासी डोंबिवलीमधील असल्याचं आढळून आलं आहे. या ५० वर्षीय प्रवाशाने त्याच विमानातून दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केला होता. या ५० वर्षीय प्रवाशाची कोरोना चाचणी केली असून कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तर, दुसरीकडे ओमिक्रॉनच्या भीतीने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची पावले पुन्हा वळू लागली आहेत. २५ नोंहेबर ते २ डिसेंबरदरम्यान नागरिकांचा लस घेण्यासाठी कल वाढला आहे. या सात दिवसात तब्बल ७७ हजार ५६६ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. क्लिक करा आणि वाचा- दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, हॉंगकॉंग यांसारख्या काही देशात विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून केपटाऊन येथून डोंबिवलीत आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्याला ओमिक्रॉन झाला आहे का, याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. तर, परदेशातून आलेल्या रुग्णाने कल्याण डोंबिवलीकरांची मात्र चांगलीच झोप उडवली आहे. क्लिक करा आणि वाचा- तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा तर नाही ना? या परिस्थितीमुळे नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली आहे. दारात आलेली तिसऱ्या लाटेच्या धोक्याची ही घंटा तर नाही ना?, तो तरुण, त्याचे कुटुंब कोणाच्या संपर्कात आले का? असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रात लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत ८७ टक्के लसीकरण झाले असले तरी २५ नोंहेबर ते २ डिसेंबरदरम्यान नागरिकांचा लस घेण्यासाठी कल वाढला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rym5dz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.