Type Here to Get Search Results !

Omicron : डोंबिवलीत आलेल्या 'त्या' सहा प्रवाशांचे रिपोर्ट आले, केडीएमसीने दिली 'ही' माहिती

डोंबिवली: करोनाचा नवीन घातक विषाणू ओमायक्रॉनची () धास्ती प्रचंड वाढली आहे. डोंबिवलीत नायजेरिया येथून सहा जण आले होते. या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची करोना चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. डोंबिवलीत २३ नोव्हेंबर रोजी नायजेरिया येथून सहा प्रवासी आल्याची माहिती कल्याण- महापालिका प्रशासनाने दिली होती. या सहा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, तो निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या ३२ वर्षीय प्रवाशाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर () प्रशासन खडबडून जागे झाले. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असून, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. केडीएमसीकडून त्याच्या कुटुंबीयांची देखील करोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या रुग्णासोबत विमानात ४२ सहप्रवासी होते. या ४२ प्रवाशांची यादी केडीएमसीने सरकारला दिली आहे. ज्या भागात प्रवासी राहतात, त्या-त्या महापालिकेकडून त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. दरम्यान या ४२ मधील आणखी एक प्रवासी डोंबिवलीमधील असल्याची माहिती मिळाली. या ५० वर्षीय प्रवाशाने त्याच विमानातून दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला होता. या ५० वर्षीय प्रवाशाची करोना चाचणी होणार आहे. केडीएमसीकडून त्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याचे केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान करोना चाचणीनंतर या प्रवाशाचे नमुने मुंबई येथे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असल्याचे केडीएमसी साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. दरम्यान, डोंबिवलीत नायजेरिया येथून आलेल्या सहा प्रवाशांची करोना चाचणी करण्यात आली असून, अहवाल निगेटिव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3piWWRo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.