Type Here to Get Search Results !

Omicron Variant : धोका वाढला! औरंगाबादमध्ये आलेल्या 'त्या' २० जणांची करोना चाचणी होणार

औरंगाबाद : जगभरात करोनाच्या ओमायक्रॉनचा या नवीन विषाणूमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता विदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची करोना चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने गेल्या १५ दिवसात विदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून २० प्रवाशांची आज चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रवाशांचा करोना रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणारा ओमायक्रॉन आता जगातील २३ देशांमध्ये पोहचला असल्याचा अहवाल नुकताच WHO कडून देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची करोना चाचणी केली जात आहे. दरम्यान औरंगाबाद प्रशासनाने गेल्या १५ दिवसात शहरात आलेल्या ३१ लोकांची यादी तयार केली असून, त्यातील २० जणांची आज करोना चाचणी केली जाणार आहे. तर इतर ११ लोकांमधील २ जण विदेशातील २ मुंबईतील तर इतर ग्रामीण भागातील असल्याचे समोर आलं आहे. दुसरी लाट ओसरत असतानाच ओमायक्रॉनच्या नवीन विषाणूमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. तर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने नवीन निर्बंध लागू केले असून, करोनाचे नियम न पाळणाऱ्या लोकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीबाबत नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. तसेच विदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ट्रॅक करून त्यावर नजर ठेवली जाणार आहे. बुधवारी १२ रुग्ण आले आढळून... औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी एकूण १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर सद्या ९१ रुग्ण सक्रिय असून बरे झालेल्या ८ रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. तर ३ जणांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर लसीकरणाची आकडेवारी सुद्धा वाढत असून १४ लाख ७० हजार ५८९ लोकांनी पहिला तर १० हजार ८९ हजार १३६ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32HMmeU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.