Type Here to Get Search Results !

omicron threat in mumbai: मुंबईकरांची धाकधूक वाढली; पूर्व आफ्रिकेतून धारावीत आलेला 'तो' प्रवासीही...रोना पॉझिटीव्ह

मुंबई: मुंबई शेजारी डोंबिवलीत ओमिक्रॉन (Omicron) या करोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्यानंतर राज्याची चिंता वाढली असतानाच काही दिवसांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील या देशातून धारावीत आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. ( threat the corona report of a passenger coming to from east africa has come positive) धारावीचा रहिवासी असलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आला होता. मात्र, त्यांच्या करोनाच्या चाचणीत त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तसेच त्याला ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झालेली आहे का याची खातरजमा करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे. सर्वांनाच या रुग्णाच्या ओमिक्रॉन अहवालाची प्रतीक्षा आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, मुंबई शहरात अद्याप ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे मुंबई महानगर पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, असे असले तरी धारावीत परदेशातून आलेल्या व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आता चिंता वाढली आहे. करोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटला रोखता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाय रिस्क देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले आहे. या व्हेरिएंटला रोखण्यासाठी महापालिकेने अ‍ॅक्शन प्लानही तयार केला आहे. त्याअंतर्गत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची आणखीही केलेली आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबई विमानतळावर आतापर्यंत ३ हजार ८३७ प्रवाशांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे. त्यांपैकी ६ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. मागील महिन्यात परदेशातून आलेल्या २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र, त्यांचा रिपोर्ट अजून आलेला नाही. दरम्यान, ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटला घाबरण्याचे काम नसून नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xVp8h0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.