Type Here to Get Search Results !

Omicron In Nagpur : राज्याची चिंता वाढली; नागपूरातही ओमिक्रॉनचा शिरकाव

नागपूरः मुंबई आणि पुण्यानंतर या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. () भारतात ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला असून महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. विदेशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंचे रुग्ण राज्यात वाढत असल्याचे चित्र आहे. नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाचाः नागपूरमध्ये ४० वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलं आहे. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या हा ४० वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या रुग्णांचे अहवाल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचाः सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो करोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) त्याला ओमिक्रॉन असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, हा रुग्ण दिघोरी भागातील आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार दहाव्या दिवशी पुन्हा 'आरटीपीसीआर' तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात येईल. सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागपूरकरांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GGhR81

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.