Type Here to Get Search Results !

Omicron In Maharashtra: चांगली बातमी! राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही

मुंबई: जगातील काही देशांमध्ये चिंता निर्माण करणाऱ्या (Omicron) या करोनाच्या () नव्या व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले असले तरी अशा रुग्णांचे निदान होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशात दिलासा म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (good news in the last 24 hours no new patient has been found in maharashtra) राज्यात आतापर्यंत एकूण १० ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळलेले आहेत. मात्र ८ आणि ९ असे दोन दिवस राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण न आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजेच राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १० इतकीच आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान १ डिसेंबर पासून ते ९ डिसेंबर या ९ दिवसांच्या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार या ९ दिवसांमध्ये हाय रिस्क असलेल्या देशांमधून ८ हजार ८४६ प्रवासी आलेले आहेत. तसेच इतर देशांमधून ४४ हजार ०५८ इतके प्रवासी आलेले आहेत. म्हणजेच ९ दिवसांमध्ये राज्यात एकूण ५२ हजार ९०४ इतके प्रवासी आलेले आहेत. त्याच प्रमाणे ज्यांची आरटीपीसीआर केलेली आहे असे हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांची संख्या ८ हजार ८४६ इतकी असून इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांची संख्या १ हजार ०९९ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ९ दिवसांत परदेशांतून आले १६ पॉझिटिव्ह प्रवासी तसेच ज्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी जीनोमीक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत अशा हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांची एकूण संख्या १३ इतकी असून इतर देशांमधून ३ प्रवासी आलेले आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह प्रवाशांची एकूण संख्या १६ इतकी आहे. तसेच आतापर्यंत विमानतळांवरून एकूण ८०जणांचे नमूने जीनोमीक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून ५५ जणांचा रिपोर्ट अजून यायचा आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pL11he

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.