Type Here to Get Search Results !

MIM च्या मोर्चाला औरंगाबादमध्ये रोखलं, गाड्यांचा ताफा आणि घोषणाबाजीने उडाला गोंधळ; पाहा व्हिडिओ

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमकडून मुंबईकडे निघालेला मोर्चा औरंगाबादमध्ये पोलिसांकडून रोखण्यात आला. इम्तियाज जलील यांच्यासह गाड्यांचा ताफा मुबंईकडे निघालेला असताना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अडवला आहे. यावेळी जलील यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता यानंतर हा मोर्चा सोडून देण्यात आला. यावेळी काही वेळ गोंधळ उडाला होता तर कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याची माहिती आहे. ( Police block imtiaz jaleel march towards Mumbai) खरंतर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमकडून मोर्चा काढण्यात आा असून आज सकाळी सात वाजता औरंगाबादच्या आमखास मैदानाहून हा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. या मोर्चाचे नेतृत्व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील करत आहेत. मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी आपण मोर्चा काढणार असल्याचं जलील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यामुळे आज सकाळी १०० पेक्षा अधिक चारचाकी गाड्या असलेला मोर्चा घेऊन जलील मुंबई निघाले आहेत. विशेष म्हणजे एमआयएमच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्रीच मुंबई शहरात कोणतेही मोर्चे, सभा, आंदोलन करता येणार नाही याचे आदेश काढले आहे. त्यामुळे आता एमआयएमचा मोर्चा मुंबईत निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Aurangabad news live Police block Imtiaz Jalils march towards Mumbai) (Aurangabad news live Police block imtiaz jaleel march towards Mumbai)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oLUzHO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.