Type Here to Get Search Results !

Live: नाशिकमध्ये साहित्य जागर सुरू; ग्रंथदिंडीत भुजबळांनी धरला ठेका

करोनाचे सावट आणि पूर्वसंध्येलाच बरसलेला पाऊस असे सगळे अडथळे पार करत अखेर आजपासून नाशिकमध्ये सुरू होत आहे. संमेलनाचे लाइव्ह अपडेट्स: लेझीमचा ताल आणि ढोल ताशांच्या गजरात नाशिकनगरी दुमदुमली. दोन वर्षांनी नाशिकमध्ये भव्य सांस्कृतिक सोहळा. नाशिककरांमध्ये प्रचंड उत्साह ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर यांनी रामकृष्ण हरीचा गाजर करत धरला ठेका महापौर बंगला, राजीव गांधी भवन सिग्नल, सीबीएस सिग्नल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड मार्गे सागरमलमोदी शाळा, सारडा कन्या विद्यालय, परशुराम सायखेडकर नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथदिंडी विश्रांती घेणार पोलिसांचा एक चित्ररथही ग्रंथदिंडीत विविध विषयांवरील चित्ररथासह आणि लेझीमच्या तालावर शालेय विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी मार्गस्थ. आकर्षक रांगोळ्या रेखाटून नाशिककरांनी सजविला दिंडी मार्ग ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीला थोड्याच वेळात प्रारंभ होणार. नाशिकमध्ये आजपासून मराठी सारस्वतांचा मेळा


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EkgBXn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.