Type Here to Get Search Results !

एसटीचे एक लाख कामगार अंगावर आले तर काय कराल?; राज ठाकरे सरकारवर भडकले!

नाशिक: गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मिटण्याची चिन्हं नाहीत. एसटी कामगार विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्य सरकार उच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीकडं बोट दाखवत आहे. त्यामुळं संपाचा तिढा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी आज संपाबाबत महत्त्वाचं विधान केलं. ( on ) नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'एसटी कर्मचारी हे या वेळी सर्व युनियन्सना बाजूला सारून एकत्र आले आहेत, त्यामुळं सरकारनं त्यांची दखल घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना इशारे दिले जात आहेत. त्याबद्दल विचारलं असता, 'जनतेनं लोकांच्या भल्यासाठी राज्य दिलं आहे, त्यांच्यावर नेत्यांनी अरेरावी करू नये. कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय, या महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांनी बोलायला हव्यात. चार-चार महिने कामगारांना पगार मिळत नाहीत हे काय आहे? जे कर्मचाऱ्यांना बोलतायत त्यांच्या घरी भ्रष्टाचाराचे पैसे आले नाही तर यांचा जीव कासावीस होतो आणि कामगारांची दिवाळी पगाराविना गेली. कसं होणार? अशा परिस्थितीत कामगार असताना तुम्ही अरेरावीची भाषा करताच कशी?,' असं संतापही त्यांनी व्यक्त केला. वाचा: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपाच्या मुद्द्यावर पत्र लिहिणार आहे, त्यांची तब्येत बरी नसल्यानं दिलं नाही. एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा ही सेवा उत्तम चालवण्यासाठी एखादी व्यावसायिक मॅनेजमेंट कंपनी का नेमली जात नाही? ते काही करायचं नाही आणि कर्मचाऱ्यांना उपदेशाचे डोस द्यायचे हे बरोबर नाही. एसटीतील भ्रष्टाचार संपल्याशिवाय कर्मचाऱ्यांना काही गोष्टी मिळणार नाही. एसटीचे कर्मचारी एक लाख आहेत, ते अंगावर आले तर काय कराल?, त्यांचेही प्रश्न आहेत. त्यांची कुटुंबं आहेत. त्यांना घर चालवायचं आहे, त्यांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DRzXSq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.