Type Here to Get Search Results !

गायी-म्हशींच्या दुधाऐवजी सुरू करा 'या' दुधाचा व्यवसाय, काही दिवसांत व्हा मालामाल

हिंगोली : पूर्वीच्या काळी दळण - वळनासाठी ओझे वाहण्यासाठी गाढवाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जायचा. रेती, मती आदी ओझे गाढवाच्या पाठीवरून वाहिले जायचे. मात्र, आता वाहनांची संख्या वाढल्यामुळे गाढव कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. देशात त्यांची संख्या सुध्दा मोजकीच राहिली आहे. या हटके पर्याय निवडत गाढवाच्या पाठीवरील ओझे कमी करुन हा व्यवसाय निवडला आहे. हा व्यवसाय बघून तुमच्या देखील भुवया उंचावतील. देशात दुध डेअरीचा व्यवसाय सर्वांना परिचित आहे. अनेकजण दूध संकलन केंद्र सुरू करुन दुधाचा व्यवसाय करतात. दूध म्हटलं तर शेती व्यवसायाशी निगडित असलेला सर्वाधिक पैसा देणारा व्यवसाय आहे. पण मुळात गायी म्हैशीच्या दुधाला हवा तितका भाव मिळत नाही. पण जर तुम्ही गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय सुरु केला तर काही दिवसातच मालामाल होणार यात शंका नाही. कारण, गायी म्हैशीच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. या दुधाचा दर ऐकून तुमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. गाढविणीचे दूध हे अत्यंत औषधी मानले जाते व त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यापासून अस्थमा, खोकला, थंडी या रोगांपासून आराम मिळतो. त्यामुळे तान्ह्या मुलांसाठी या दुधाला प्रचंड मागणी आहे. दरम्या,न केस आणि सौंदर्यसाठी पण ही खूप लाभकारक दूध आहे. सौंदर्य प्रसादनांसाठी या दुधाचा उपयोग केला जातो. गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण, किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात हातपायावरून वारे जाणे हे रोग या दुधाने बरे होतात. होणारा दुधाचा फायदा लक्षात घेता दिलीप दिलीप या तरुणानं रेती व्यवसाय पुरते मर्यादित न राहता गाढवांच्या डोक्‍यावरील ओझं हलकं करून दारोदारी फिरून गाढविनीचे दूध विकण्याचा हटके पर्याय निवडला आहे. दुधातील फायदे आणि गुणधर्म लक्षात घेता. दुध विक्रीस मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. दिलीप हा मुखेड तालुक्यांतील असून तो सद्या दुर-दुर जाऊन हा व्यवसाय करतो आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xYStHr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.