Type Here to Get Search Results !

चिंता वाढली! विदेशातून परतलेल्या २८ जणांच्या पासपोर्टवर पत्ता धुळे जिल्ह्याचा, प्रत्यक्षात...

धुळे: गेल्या काही दिवसांत विदेशातून जिल्ह्यात आलेल्या २८ नागरिकांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलाय. या २८ नागरिकांमध्ये २१ नागरिक हे शहरातील रहिवासी असून, उर्वरित हे ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. यातील अनेक नागरिक हे आता पुणे, नाशिक, मुंबईसारख्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या तपासणी बाबतची आणि त्यांच्या सद्यस्थितीतील पत्त्याची माहिती त्या-त्या जिल्ह्याला देण्यात आलेली आहे. वाचा: करोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे सर्वत्र भीतीचे सावट निर्माण झालेले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनही आता कामाला लागले आहे. राज्य शासनाकडून आलेल्या माहितीप्रमाणे २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान विदेशातून २८ नागरिक आलेले आहेत. त्यातील नऊ जण हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले आहेत. या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. या नागरिकांच्या पासपोर्टवर धुळे जिल्ह्याचा पत्ता असला तरी यातील बहुतांश सद्यस्थितीत पुणे, नाशिक, मुंबई या महानगरांमध्ये वास्तव्याला आहेत. प्रशासनाने या नागरिकांचा शोध घेतल्यावर ही माहिती समोर आलेली आहे. विदेशातून आलेल्या या नागरिकांचे नवीन पत्ते हे त्या-त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. धुळे महापालिकेकडून शोधमोहीम सुरूच ग्रामीण भागातील सर्व सात नागरिकांचा पत्ता शोधण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. त्यातील पाच जण हे नाशिक आणि पुणे येथे स्थायिक असून, उर्वरित दोघांचे करोना चाचणीचे नमुने घेण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. धुळे महानगरपालिका नेहमीप्रमाणे संथ गतीने काम करताना दिसून येत आहे. जे २१ नागरिक विदेशातून आलेले आहेत, त्यांची शोधमोहीम महापालिकेद्वारे अजून सुरूच आहे. अनेकांचे पत्ते अजून पालिकेला सापडलेले नाहीत. या नागरिकांच्या करोना चाचणीचे नमुने देखील अद्याप घेतले गेलेले नाहीत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31AA7AL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.