Type Here to Get Search Results !

पुरामुळं नव्हे, फेसामुळे अडते 'या' पुलावरील वाहतूक; कोर्टानं फटकारल्यानंतरही...

विजयसिंह होलम । पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यावर पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. नगरमध्ये मात्र प्रदूषित सीना नदीतील पाण्याचा फेस पुलावर येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. परिसरातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही हे चित्र कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे. नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीची ही अवस्था आहे. नगर शहराचे सांडपाणी थेट या नदीत सोडण्यात येते. या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प अद्याप उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील कचरा डेपो पाठोपाठ सीना नदीचे प्रदूषण हाही एक गंभीर विषय आहे. यावरून न्यायालयाने महापालिका आणि सरकारलाही अनेकदा फटकारले आहे. या नदीला पूर अभावानेच येतो. आसपासच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर छोटे पूल आहेत. पावसाळ्यातही काही अपवाद वगळता या पुलांवरून पाणी जात नाही. मात्र, हिवाळ्यात येथे वेगळाच प्रश्न निर्माण होतो. नदीत खळखळणाऱ्या पाण्याचा फेस तयार होऊन तो पुलांवर पसरतो. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबाही होतो. वारंवार तक्रारी करूनही यंत्रणेकडून याची दखल घेतली जात नाही,’ अशी खंत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी व्यक्त केली. वाचा: ‘नगर शहराजवळून जाणाऱ्या वाकोडी ते वाळकी या रस्त्यावर हा प्रश्न कायम असतो. पुलाजवळ मोठ्या प्रमाणात फेस तयार होऊन तो पुलावर पसरतो. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता दिसू शकत नाही. वाहतुकीचा खोळंबा होतो. मी स्वत: अनेकदा या ठिकाणी अडकलो आहे. यासंबंधी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. महापालिका, प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्व यंत्रणांना कळवून झाले. मात्र कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही,’ असेही कार्ले यांनी सांगितले. जिल्हा परिषद-महापालिकेत वाद नगर शहरातून वाहणाऱ्या या नदीवर पुढे अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना आहेत. कर्जत तालुक्यात या नदीवर धरणही आहे. शहरातून पुढे जाणाऱ्या नदीचे पाणी पिण्यासच नव्हे तर शेतीसाठीही उपयुक्त नसल्याचे अहवाल अनेकदा आले आहेत. त्यावरून जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यात वादही सुरू आहेत. अनेकदा खालच्या गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. केवळ नगर शहरातील सांडपाणीच नव्हे तर काही कंपन्यांचे रासायनयुक्त पाणीही नदीत सोडले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच पाण्याचा दाट फेस होऊन पुलावरील वाहतुकीचा खोळंबा होतो. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DdVbtx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.