Type Here to Get Search Results !

प्रवासी वाहतुकीवरून खाजगी वाहनचालकांत फ्री-स्टाईल हाणामारी!

औरंगाबादः गेली २४ दिवस झाले एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. त्यामुळे अशा काळात प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे खाजगी वाहनचालकांमध्ये सुद्धा प्रवासी भरण्यासाठी स्पर्धा लागली असून वादविवाद होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.औरंगाबादमध्ये सुद्धा असाच काही प्रकार पाहायला मिळाला असून प्रवासी वाहतुकीवरून खाजगी वाहनचालकात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील सिडको बस स्थानकातील एसटी कर्मचारीसुद्धा संपात सहभागी असल्याने बस पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात असलेल्या सिडको सिग्नल जवळ खाजगी वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहेत. तर प्रवाशांना नेण्यासाठी वाहनचालकांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. याच ठिकाणी शनिवारी प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादात वाहनचालकांमध्ये चांगलीच फ्री-स्टाईल हाणामारी झाली. मात्र तिथंच उपस्थित असलेल्या इतर वाहनचालकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. वाचाः सिडको प्रमाणेच औरंगाबाद मुख्य बसस्थानकाच्या बाहेर सुद्धा प्रवासी भरण्यासाठी वाहनचालक मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत. तर खाजगी ट्रॅव्हल्सचे एजंट सुध्दा याठिकाणी प्रवासी शोधताना मोठ्याप्रमाणात पाहायला मिळतात. तर काही जण बस स्थानकात जाऊन प्रवाशांना पकडून आणत आहेत. वाचाः मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल! सिडको बस स्थानक सिग्नलवर झालेल्या खाजगी वाहनचालकांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक रिक्षा चालक आणि दुसरा टॅक्सी चालक यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर नंतर दोघांमध्ये आधी बाचाबाची आणि नंतर हाणामारी होतांना दिसत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dmWWdm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.