Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, मेंदूतील रक्तस्त्रावामुळे गेला जीव

नांदेड : नांदेडमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आणखी किती जणांचा मृत्यू होणार याबद्दल प्रश्नचिन्ह विचारण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंदूतील रक्तस्त्रावामुळे आंदोलन स्थळी कर्मचारी बेशुद्ध पडले होते. त्यांना यानंतर तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप वीर असं मृत कर्मचाऱ्यांचं नाव आहे. नांदेड आगारात वाहक पदावर ते कार्यरत होते. (बातमी अपडेट होत आहे.)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EjBiTm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.