Type Here to Get Search Results !

शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी २१ इच्छुक, पण…

विजयसिंह होलम । शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अहमदनगर महापालिकेतील नगरसेवक याचे पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या जागेसाठी सध्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या जागेवर इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे पहायला मिळत असले तरी प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्याबाबत 'थांबा आणि वाट पाहा' धोरण असल्याचे दिसून येते. छिंदम () याने दाखल केलेल्या एका याचिकेची सुनावणी प्रलंबित असल्याने उमेदवार सावध खेळी खेळत असल्याचे दिसून येते. तब्बल २१ जणांनी उमेदवारी अर्ज नेले असले तरी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना एकानेही अर्ज दाखल केलेला नाही. शहरातील प्रभाग क्रमांक ९ क मधील पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस झाले असले तरी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. पहिल्या तीन दिवसांत केवळ एका जागेसाठी २१ इच्छुकांनी कोरे उमेदवारी अर्ज नेले आहेत. पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात छिंदमने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर ३ डिसेंबरला सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे तेथे काय निकाल येतो, याचा अंदाज घेण्यासाठी उमेदवार थांबले असल्याचे सांगण्यात येते. वाचा: २०१३ च्या निवडणुकीतही छिंदम याच प्रभागामधून निवडून आला होता. त्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यावर राज्यभरातून त्याचा निषेध झाला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, अटकही झाली. मधल्या काळात पहिल्या पदाची मुदत संपली. तो २०१८ मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरला आणि निवडूनही आला. मधल्या काळात त्याचे पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होती. तो दुसऱ्यांदा निवडून आल्यावर ती पूर्ण झाली. त्यामुळे त्याचे पद रद्द झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. असे असले तरी त्याने आधीच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत त्याने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही अद्याप उमेदवारी अर्ज नेलेला नाही. त्यावेळी एवढा वाद होऊनही तो या प्रभागातून विजयी झाला होता. पहिल्या टर्ममध्ये तो भाजपचा उमेदवार होता, उपमहापौरपदही त्याला मिळाला होते. नंतर हा वाद उपस्थित झाल्यावर तो अपक्ष म्हणून निवडून आला. त्यामुळे त्याचे या भागातील राजकीय प्राबल्य दिसून येते. सध्याच्या पोटनिवडणुकीत त्याने त्याची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार अद्यापही अंदाज घेत आहेत. निवडून येणाऱ्या नगरसेवकाला पुढील सव्वा दोन वर्षे मिळणार आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31gYvY8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.