Type Here to Get Search Results !

शरद पवारांना 'तो' सल्ला मीच दिला होता; नवाब मलिकांनी केला मोठा गौप्यस्फोट

पुणे : ‘अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री यांना नोटीस पाठवल्यानंतर ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच पवार यांना दिला होता,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी केला आहे. तसंच ‘ईडी’चा पदार्फाश करणार असून, हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. () महाविकास आघाडीच्या वतीने नवाब मलिक यांचा आझम कॅम्पस येथील सभागृहात गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पवार यांना ‘ईडी’ने नोटीस पाठवल्यानंतर आपल्या सल्ल्यानुसार पवार यांनी भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट मालिक यांनी केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका नंदा लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. मलिक म्हणाले की, ‘पवार यांना ‘ईडी’ने नोटीस पाठवल्यानंतर काय करायचे, यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी काहीजणांनी वकिलांचा सल्ला घेण्याची सूचना केली. तेव्हा ही कायदेशीर लढाई नसून, राजकीय लढाई असल्याचं निदर्शनास आणून देऊन पवार यांना ‘ईडी’च्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली होती.’ ‘केंद्र सरकारकडून ‘ईडी’ची भीती दाखविली जाते. मात्र, आमच्याकडे असलेली सीडी बाहेर काढली, तर त्यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक पाऊल मागे गेले आहेत. मी आता गप्प बसणार नसून, दोन हात करण्याची तयारी आहे,’ असं आव्हान मलिक यांनी दिलं आहे. दरम्यान, मंदिरांच्या जागा कोणी विकल्या आहेत, ते लवकरच बाहेर काढणार आहे. अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत. हेदेखील बाहेर काढणार असल्याचा पुनरुच्चार मलिक यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EiS98T

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.