Type Here to Get Search Results !

'मी नगरला पोलीस आहे, तपासासाठी जळगावात आलोय' असं सांगून त्यानं...

किशोर पाटील । 'मी नगरला पोलीस आहे. तपासासाठी जळगावात आलोय', अशी बतावणी केली. त्यांनतर बनावट ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. दुचाकी मागितली ती घेऊन तो गेला, तर परत आलाच नाही. पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वाजानगर येथील शेख आसिफ शेख मुनाफ (वय ३२) हे अग्रवाल चौकात सोफासेट विक्रीचा व्यवसाय करतात. ४ डिसेंबर रोजी शेख आसीफ हे नेहमीप्रमाणे अग्रवाल चौकात सोफा सेट विक्रीच्या ठिकाणी बसलेले असताना एक अनोळखी इसम आला. त्याने शेख आसिफ यांना जिल्ह्यात 'खूपिया पोलीस' असल्याचे सांगितले. नगर येथे आठ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी तपासासाठी जळगावात आल्याची बतावणी केली. पाेलीस असल्याबाबतचे बनावट आयकार्डही त्याने शेख आसिफ यांना दाखविले. त्यानंतर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जायचे असल्याचे सांगत शेख आसिफ यांच्याकडं दुचाकीची मागितली. शेख आसिफ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला त्यांची एम. एच. १९ ए. वाय. ८२३२ ही दुचाकी दिली. अनोळखी इसम दुचाकी घेऊन गेला, त्यानंतर पुन्हा परतलाच नाही. शेख आसिफ यांनी त्यांचा भाऊ शेख युसूफ व इतरांसोबत परिसरात तसेच शहरात इतरत्र दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी काही सापडली नाही. अखेर रविवारी शेख आसिफ यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ImCF5U

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.