Type Here to Get Search Results !

ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठ्या घडामोडी; SITने मुंबईबाहेर नोंदवला आर्यनचा जबाब

मुंबई: मुंबईतील प्रकरणी एनसीबी एसआयटीच्या तपासाला वेग आला आहे. एसआयटीने आज या प्रकरणात याचा जबाब नोंदवला. मुंबई ऐवजी नवी मुंबईतील बेलापूर येथे आर्यनला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले. याबाबत गुप्तता बाळगण्यात आली. दरम्यान, या तपासापासून एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांना दूर ठेवण्यात आले आहे. ( ) वाचा: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. अभिनेता याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे हे प्रकरण देशभर गाजत आहे. त्यातच आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाला असून त्यात पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडे यांचे नाव घेतले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबी महासंचालकांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी नेमली आहे. वानखेडे यांच्याकडील या प्रकरणांचा तपास आता एसआयटी करत आहे. याच तपासाच्या अनुषंगाने आज आर्यनचा जबाब नोंदवण्यात आला. वाचा: आर्यन खान याला जामीन मंजूर करताना दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट हायकोर्टाने घातली आहे. त्यानुसार आर्यन आज दुपारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर झाला. तिथून घरी परतल्यावर आर्यन बेलापूर येथे रवाना झाला. त्याच्यासोबत बॉडीगार्ड व लीगल टीमही होती. बेलापूर येथील रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स कॅम्प येथे एसआयटीने आर्यनचा जबाब नोंदवला. याबाबत गुप्तता बाळगण्यात आली. माध्यमांची गर्दी टाळण्यासाठी हे ठिकाण निवडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरणाची व्याप्ती पाहता हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू आहे. दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन, त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मूनमून धामेचा या तिघांसह आतापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यनला जवळपास एक महिना कोठडीत राहावं लागलं होतं. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HhVOW3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.